Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी लांबविणाऱ्या संशयिताला जिल्हापेठ पोलिसांकडून अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीपेठ परिसरातील अनुभूती शाळेजवळून एका तरुणाची दुचाकी लांबविल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात दुचाकी चोरुन नेणाऱ्या संशयिताला पोलिसांनी शुक्रवार १४ जुलै रोजी अटक केली आहे. चंद्रकांत रामदास साळुंखे वय ३० रा हिराशिवा कॉलनी असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

 

जळगाव तालुक्यातील विटनेर येथील सुनील दिलीप सुर्यवंशी वय ३० हा तरुण १३ जुलै रोजी जळगाव शहरातील नवीपेठ परिसरात आला होता, यादरम्यान त्याने त्याची एम.एच. १९ सी.पी. ९५२२ या क्रमाकांची दुचाकी अनुभूती शाळेजवळ उभी केली होती. काम आटोपून सुनील हा परत आला असता, त्याला त्याची दुचाकी मिळून आली नाही, सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने सुनील सुर्यवंशी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी चंद्रकांत रामदास साळुंखे याला अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक भारती देशमुख ह्या करीत आहेत.

Exit mobile version