जि. प. प्रशासनास १४ लाखांहून अधिक पुस्तके प्राप्त – शिक्षणाधिकारी

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा परिषद प्रशासनास मे महिन्यातच सर्व शिक्षा अभियानांतर्गत १४ लाख ८७ हजार ६९१ पुस्तके प्राप्त झाली आहेत. १३ जून रोजी शाळा नियमित सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या पुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी म्हटले आहे.

गेल्या दोन अडीच वर्षापासून संसर्ग प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. असे असले तरी बहुतांश विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक लाभ देण्यात येत होता. संसर्ग काळात बरीच मुले शाळेत गेलीनसल्यामुळे बहुतांश दुकानावर देखील पुस्तकांना मागणी कमी होती. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत वितरीत केल्या जाण्या पुस्तकांची संख्या त्यामानाने कमी झाली आहे.

जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत २७५० पात्र शाळांची संख्या आहे. यावर्षी जिल्हा परिषद प्रशासनास १४ लाख ८७ हजार ६९१ क्रमिक पाठ्यपुस्तक प्राप्त झाली असून सध्यस्थितीत १ हजार ९२१ शाळास्तरावर प्राप्त झालेली पुस्तके वितरीत करण्यात आली असल्याची माहिती जि.प.प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील यांनी दिली.

Protected Content