Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणावर चाकूने वार करत दुखापत: एकावर गुन्हा दाखल

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील आंबेडकर नगर परिसरात तरूणाने दुचाकीवर बसू दिले नाही या रागातून एकाने शिवीगाळ करत चाकूने वार करून दुखापत केल्याची घटना बुधवार २० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली होती. या प्रकरणी शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र उर्फ मनोज नवल राठोड (वय-२७) रा.आंबेडकर नगर, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार २० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता महेंद्र राठोड हा त्याच्या दुचाकीने जळगाव शहरातील आंबेडकर नगर परिसरातून जात होता. त्यावेळी रस्त्यावर विकी ज्ञानेश्वर पाटील माळी (वय-१८) रा.जानकी नगर, जळगाव याने दुचाकीवर बसू देण्याची मागणी केली. त्यावर दुचाकीस्वार महेंद्र राठोड यांनी दुचाकीवर बसू दिले नाही. याचा राग आल्याने संशयित आरोपी विकी ज्ञानेश्वर माळी याने शिवीगाळ करत चाकूने वार दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विकी माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव हे करीत आहे.

Exit mobile version