Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन दुचाकीच्या अपघातात तरूण गंभीर जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील धानोरा येथून पष्टाने येथे जात असलेल्या तरूणाच्या दुचाकीला पष्टाने फाट्याजवळ अज्ञात दुचाकीने समोरून जोरदार धडक दिल्याची घटना घडली होती. या तरूण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी अज्ञात दुचाकीधारकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद दिलीप पाटील वय ३५ रा. पष्टाने ता. धरणगाव असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद दिलीप पाटील हे आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथे वास्तव्याला आहे. रविवार २४ मार्च रोजी कामाच्या निमित्ताने दुचाकी एमएच १९ एफएन २७८० ने धानोरा येथे गेले होते. सायंकाळी ७ वाजता धानोरा येथून पष्टाने येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. त्यावेळी पष्टाने फाट्याजवळून जात असतांना अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शरद पाटील हे गंभीर जखमी झाले. शरद पाटील यांनी उपचार घेतल्यानंतर बुधवार २७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पवार हे करीत आहे.

Exit mobile version