Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जमिनावर सुटून घरी जात असतानाच झाला ‘गेम’ (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । जामिनावर सुटून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना सायंकाळी नशिराबाद येथील उड्डाणपुलाच्या खाली घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर यात त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर (वय-२०) रा. पंचशील नगर भुसावळ हा वडिल मनोहर सुरडकर यांच्यासह जळगाव येथून भुसावळ येथे दुचाकी क्रमांक (एमएच 19 एव्ही 9656) जात असताना सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार आणि चॉपर हल्ला केला. हल्ल्यात धम्म सुरडकर हा जागीच ठार झाला आहे. तर सोबत असलेले वडील मनोहर सुरडकर हे गंभीर जखमी झाले आहे. जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे.

 

दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण मयत धम्म  याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. यात गुन्ह्यात तो गेल्या ११ महिन्यांपासून कारागृहात होता. आज मंगळवार २१ सप्टेंबर रोजी त्याची जामीनावर भुसावळ न्यायालयाने सुटका करण्यात आली होती. त्याचे वडील मनोहर हे भुसावळ न्यायालयातून  बेल रिलीज ऑर्डर घेवून जळगाव कारागृहात आले होते. त्यानंतर सायंकाळी ते मुलगा धम्म याला घेवून नशिराबाद मार्गे निघाले. दरम्यान, अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी नशिराबाद पुलाखाली दोघांना अडविले. सुरूवातीला एकाने धम्म याच्यावर गोळ्या झाडल्या तर दुसऱ्याने वडील मनोहर याच्यावर चॉपर हल्ला केला.  हल्ल्यात धम्म हा जागीच ठार झाला तर वडील मनोहर हे गंभीर जखमी झाले. धम्म हा जागीच ठार झाल्याचे पाहून अज्ञात हल्लेखोर घटनास्थाळून पसार झाले.

सिगरेट पिण्याने केला घात

मयत धम्मा आणि त्याच्या वडिलांसोबत अजून तीन जण होते. हे सर्व पाचही जण हायवेच्या उड्डाणपुलावरून न जाता खालील बाजूला असलेल्या सर्व्हीस रोडवरून उड्डाणपुलाच्या खाली सिगरेट ओढण्यासाठी थांबले. हीच संधी साधून त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी धम्मप्रिय व त्याच्या वडिलांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. तर दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी पिस्तूल काढून गोळीबार सुरू केला. यात धम्मप्रियच्या छातीत व डोक्यात गोळी शिरली. तर त्याच्या वडिलांवरही चॉपरले हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. सोबत असलेल्या तिघांना या तरूणांनी इजा केली नाही. मात्र भितीने गाळण उडाल्याने ते घटनास्थळावरून पळून गेले. त्यांनीच धम्माप्रियाचे कुटुंबिया आणि पोलिसांना याची माहिती कळविली. अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या या थरारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांसह अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी वाघचौरे घटनास्थळी दाखल झाले होते.

विशेष म्हणजे धम्म याचा उद्या 22 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,  भुसावळ विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी घटनस्थळी धाव घेतली. मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

Exit mobile version