Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गेंदालाल मिल परिसरातून तरूण बेपत्ता; शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर जवळील गेंदालाल मिल परिसरातून २८ वर्षीय तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

विजय शंकर लोखंडे (वय-२८) रा. गेंदालाल मिल, शिवाजी नगर, जळगाव असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय लोखंडे हा आपल्या कुटुंबियांसह गेंदालाल मिल परिसरात वास्तव्याला आहे. शनिवार २५ जून रोजी सकाळी ११ वाजता विजय हा घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. सायंकाळी घरी न आल्याने त्याच्या आईसह कुटुंबियांनी परिसरात नातेवाईक व मित्र मंडळी यांच्याकडे तपास केला असता तो कुठेही आढळून आला नाही. विजयची आई सुमन लोखंडे यांनी सोमवारी २७ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गौतम केदार करीत आहे.

Exit mobile version