Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंगावर वीज कोसळल्याने शिवारात तरुण जागीच ठार !

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नागदुली शिवारातील शेतात अचानक वीज कोसळल्याने ३५ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची दु:खद घटना शुक्रवारी १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने तरुणाचे वडील थोडक्यात बचावले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीकांत उर्फ भैया भिका पाटील ( वय ३५ ) हा तरुण आपल्या परिवारासह नागदुली येथे वास्तव्यास असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्यांचे नागदुली शिवारात शेत आहे. आज शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळीवारासह पाऊस झाला. त्यावेळी श्रीकांत हा वडील भिका लक्ष्मण पाटील आणि काही मजुरांसोबत शेतातील चारा कुट्टी जमा करत होते. त्यावेळी श्रीकांत पाटील हा तरुण लाकूड घेण्यासाठी बाजूला जात असताना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना त्याचे वडील भिका पाटील यांच्यासमोर झाली. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली आणि शेजार्‍यांच्या मदतीने वाहनात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी मयत घोषित केले. दरम्यान एकुलता एक मुलगा गेल्याने वडील व नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. मयताच्या पश्चात आर्ई, वडील, मुलगा, दोन मुली तसेच पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Exit mobile version