Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समोरासमोर दुचाकीच्या धडकेत तरूण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळील पेट्रोल पंपानजीक दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी महिनाभरानंतर शनिवारी २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात दुचाकीधारकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,  शोएब रऊफ पिंजारी (वय-२५) रा. खंडेराव नगर, पिंप्राळा,जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. २६ जुन रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शोएब हा त्यांची दुचाकी क्रमांक (एकएच १९ बीडब्ल्यू ७१०९) ने जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच १९ बीके १४२५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार शोएब पिंजारी हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर अपघात घडल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वार हा दुचाकी घेवून पसार झाला होता. दरम्यान शोएब पिंजारी याने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शनीवारी २२ जुलै रोजी अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक प्रतिभा पाटील करीत आहे.

Exit mobile version