Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धुळ्याच्या तरुणाचा चोपड्यात खून ; आरोपी पोलिसात हजर

ba042972 79b1 4969 b6bb d7131cb2612f

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील धरणगाव रस्त्यालगत हतनुर कालव्याच्या पाटचारीवर आज (दि.११) पहाटे एका रिक्षामध्ये धुळे येथील रहिवासी विशाल गवळी (वय ३३) याचा रुमालाने गळा आवळून आणि डोक्यावर दगडाने मारुन खुन करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खुन केल्यानंतर आरोपी वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी (वय २८) रा.बारीवाडा, चोपडा याने स्वतःहून शहर पोलिस स्टेशनला येऊन मी खुन करुन आलो आहे, असे सांगितल्याने पोलिसांनी त्याला लागलीच अटक केली आहे.

 

याबाबत पोलिस सुञांकडुन मिळालेली माहिती अशी की, २०१२ मध्ये विशाल गवळीने त्याच्या मित्राच्या सहकार्याने आरोपी वैभव गवळीचा मामा सदाशिव गवळी यांच्या अगांवर अँसिड फेकून धुळ्यात त्याचा खुन केला होता. मामाचा खुन विशालने केला म्हणून वैभवच्या डोक्यात गेल्या सात वर्षापासुन राग होता. वैभववर या आधीच येथील शहर पोलिसात ८२/१९, ३०७ अशा कलमांखाली गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो फरार होता, तसेच एवढे दिवस तो धुळ्याला विशाल गवळी याचाकडेच राहत होता. मामाचा खुनाचा बदला घेण्याचा निश्चय करून वैभवने काल (दि १०) रोजी रात्री विशालची रिक्षा भाड्याने करून त्याला चोपड्यात आणले. येथे आल्यावर ‘तु माझा मामा खुन केला आहे, म्हणून मी तुझ्या आज मर्डर करणार’ असे सांगून वैभवने रिक्षातच (क्र.एम.एच. १८, ए.पी. ०५९७) रुमालाने विशालचा गळा आवळून व डोक्यात दगड मारुन खुन केला. त्यानंतर तो पोलिस ठाण्यात हजर झाला. सदर घटनेनंतर पोलिसांनी डिवायएसपी सौरभकुमार अग्रवाल व पी.आय. भीमराव नंदुरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विशालच्या मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून तो नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. देवकर सिध्दांपा गवळी धुळे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पी.आय. नंदुरकर करीत आहेत.

Exit mobile version