Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेतून पडल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोकेश रविराज मराठे (वय-१७, रा. बामणोद ता. यावल) असे मयत मुलाचे नाव आहे.

याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, लोकेश एक वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईने त्याला बामणोद येथे महानुभव पंथाच्या आश्रमात ठेवले. तेथे त्याच्या गुरुचेही निधन झाले. त्यानंतर हा तरुण इतरत्र कामे करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, सोमवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास लोकेश हा नाशिककडून भुसावळकडे येत असताना रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे.

याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सचिन भावसार, पोलिस नाईक नरेंद्र चौधरी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याची माहीती बामणोद येथे मिळताच तेथील नागरिकांनी जळगाव येथे धाव घेतली. दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे बामणोद परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version