Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी अपघातात तरूण गंभीर; एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।भावाला घेण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वाराला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक देवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील चंदूआण्णा नगरात राकेश रोहीदास लोखंडे हा तरुण वास्तव्यास असून तो सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता (एमएच १९ डीडबल्यू ११७५) क्रमांकाच्या दुचाकीने रिंगरोड उड्डाणपुलाजवळून भावाला घेण्यासाठी जात होता. याचवेळी समोरुन (एमएच १९ सीक्यू २६७३) वरील दुचाकीस्वाराने राकेश लोखंडेच्या दुचाकीला जोरदार धडक देवून तो तेथून पळून गेला. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून तो धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला ओळखत असून तो अनिल पाटील रा. पिंप्राळा बांधकाम ठेकेदार असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन अनिल पाटील विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version