Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

म्हाडा कॉलनी परिसरात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २८ डिसेंबर रेाजी दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

नीलेश गुलाबसिंग ठाकूर (वय ३५, रा. म्हाडा कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश ठाकूर हा आपल्या कुटुंबियांसह म्हाडा कॉलनी जळगाव परिसरात वास्तव्याला आहे. मजूरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी २८ डिसेंबर रेाजी नीलेशचे कुटुंबीय बाहेर गेलेले होते. त्यावेळी निलेश हा घरात एकटाच होता. घराला आतून बंद करून दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शेजारचांच्या लक्षात आले. त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. तरूणाच्या आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे.  याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोहेकॉ विजय पाटील तपास करीत आहेत.

 

Exit mobile version