Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माळगाव शिवारात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या; पोलीसात नोंद

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मळगाव शिवारात ३५ वर्षीय तरूणाने शेतावर बांध्यावर झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, नवन गंगाधर सुर्यवंशी (वय-३५) रा. वडाळा ता. चाळीसगाव यांनी भडगाव तालुक्यातील मळगाव शिवारातील शेतात असलेल्या बांधवरील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज बुधवारी २० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताचा मृतदेह भडगाव हुन जळगाव येथे शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत मळगाव येथील रहिवासी भाऊसाहेब जगन्नाथ जाधव यांच्या खबरीवरून भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास सहाय्यक फोजदार छबूलाल नागरे हे करीत आहेत . घटनास्थळी दुपारी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर सह भडगाव पोलीस पथकाने भेट दिली. तसेच जळगाव येथील फॉरेन्सिक लॅब ची टीमने पहाणी करत स्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. तर सायंकाळी एलसीबीच्या एक पथकाने भडगाव तालुक्यात येऊन चौकशी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version