Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वैजापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा अटकेत

minor girl

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील वैजापूर येथे काल (दि.१३) सख्या चुलत बहिणी असलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला येथील तालुका पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे.

 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर येथील देवेंद्र मोरे (वय २२) याने काल रात्री ८.३० च्या सुमारास पाच आणि सहा वर्षांच्या सख्ख्या चुलत बहिणी असलेल्या दोन बालिकांसह अन्य एका मुलीस वैजापूर-मेलाणे रस्त्यावर असलेल्या शेतात नेवून दोघींवर अत्याचार केले. तिसरी बालिका त्याच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरल्यामुळे ती बचावली. अत्याचारग्रस्त बालिकांपैकी एक अत्यवस्थ असून तिचा तोंडावर जखमा असून तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बालिकेच्या रडण्याचा आवाज एकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत त्या नरधमाने तिथून पळ काढला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर डॉ.चंद्रकांत बरेला यांनी बालकांना वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, प्राथमिक उपचारानंतर त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात
दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक भिमराव नांदुरकर यांनी रात्री १२.३० च्या सुमारास संशयीत आरोपी देवेंद्र मोरे याला ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version