तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना ! : देवेंद्र मराठे यांची टीका

जळगाव प्रतिनिधी | आजी-माजी पालकमंत्र्यांमधील संबंध म्हणजे तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना…अशी झाली असल्याची टीका एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आजच्या जामनेर दौर्‍यावर एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी टीका केली आहे. या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महा विकास आघाडी सरकारमधील मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचा गेल्या दोन दिवसांमधील ढग फुटी पावसामुळे नुकसान झालेल्या जामनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा आज आयोजित होता. पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्या पालकमंत्र्यांनी जाणूनच घेतल्या असतील अशी अपेक्षा आहे, परंतु पूरग्रस्त भागाचा दौरा म्हणजेच त्या भागातील जनतेला एक आधार देण्याची वेळ असते. त्याच पद्धतीने नुकसानग्रस्त शेतकरी त्याच पद्धतीने तेथील जनता यांना अन्नधान्य व त्यांच्या जेवणाची सोय करणं हे पालक मंत्र्याचं प्रथम कर्तव्य असतं. परंतु या दौर्‍यामध्ये त्या पद्धतीचे चित्र दिसलं नाही.

आज आम्ही कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जरी महाराष्ट्र सरकार मध्ये असलो व सदरचे मंत्री हे कॉंग्रेस पक्षाच्या सहकारी पक्षातील जरी असले तरी त्यांनी मात्र आज पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले असता, त्यांनी आद्यकर्तव्य म्हणजेच पूरग्रस्त भागाचा दौरा व तेथील जनतेला हवी ती मदत करायला पाहिजे होती. परंतु पालकमंत्री मात्र पूरग्रस्त दौर्‍यावर तीच भाजप पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन निवांतपणे महाजन यांचा पाहुणचार घेत बसले. पालकमंत्र्यांचे या पद्धतीचे वागणे अत्यंत निंदनीय आहे व निषेधार्थ आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हा एन एस यु आय संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी याचा निषेध व्यक्त केला.

Protected Content