Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘आपला लेक, आपल्या दारी’ अभियानाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

जामनेर प्रतिनिधी | शिवसेना-युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने ‘आपला लेक, आपल्या दारी’ या अभियानाचा शुभारंभ होत असून या अभियानाच्या पत्रकाचे पालकमंत्री, ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.

रविवार, दि.३० जानेवारी रोजी पालकमंत्री, ना.गुलाबराव पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जळगाव म.न.पा.उपमहापौर कुलभूषण पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियानाच्या पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

दि.०१ फेब्रुवारी २०२२ पासुन या अभियानाचा शुभारंभ होत आहे. हे अभियान युवासेना विस्तारक कुणाल दराडे आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असून शिवसेना-युवासेनेचे सर्व पदाधिकारी गावागावात जाऊन प्रत्येक घरातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि शासकीय योजनांचा लाभ सर्व सामान्य माणसाला जास्तीतजास्त होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी ना.गुलाबराव पाटील साहेबांच्या हस्ते पळासखेडा काकरचे विनोद राठोड, बळीराम राठोड, देऊळगाव गुजरीचे रविंद्र सापतोल, शुभम जैस्वाल, सुनिल तेली, अक्षय तेली तर शिवसेना जिल्हाप्रमुख आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शेरी येथील अक्षय पाटील व लोंढ्री तांडा येथील पवन पवार यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

प्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, माजी युवा उपजिल्हाप्रमुख ॲड.भरत पवार, युवासेना ता.कार्यकारणी सदस्य मयुर पाटील, तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव, उपतालुकाप्रमुख रोहन राठोड, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष प्रा.ईश्वर चोरडिया, युवा उपतालुका प्रसिद्धीप्रमुख कार्तिक काळे, शिवसेना गट प्रमुख विकास अहिर, पं.स.गण प्रमुख तथा रोहयो समिती सदस्य अरुण सावकारे, शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख श्यामराव पाटील, मोरगाव उपसरपंच संतोष राठोड, पिंपळगाव गोलाईत ग्रा.पं‌.सदस्य हरिसिंग सिसोदिया, तळेगाव ग्रा.पं.सदस्य दिपक पाडोळसे, कैलास दांडगे, योगेश वंजारी, बिरेंद्रसिंग राठोड, वैभव दांडगे, सागर कांडेलकर, सचिन राठोड यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Exit mobile version