Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरुण येथे तरुणीला मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ‘घरी नको येत जाऊ’ असे सांगितल्याने तरुणाने तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना मेहरुण परिसरात घडली आहे. याप्रकरणी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार असे की, समीर कमरोद्दीन शेख हा तरुणीच्या भावाचा मित्र आहे. भाऊ घरी नसतांना समीर हा तरुणीच्या घरी ये जा करत होता. त्यामुळे तरुणीने समीर यास घरी येत जावू नकोस असे सांगितले असता, गुरुवारी दुपारी तरुणी तिच्या घरासमोर असतांना, समीर याने तरुणीला शिवीगाळ करत तिच्या कानशीलात लगावली तसेच धमकी दिली. या तरुणीच्या तक्रारीवरुन समीर कमरोद्दीन शेख यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.

 

 

Exit mobile version