Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणांनी राजकारणात येऊन विविध सामाजिक कार्ये करावे – आमदार पाटील

पाचोरा (प्रतिनिधी) “गाव तिथे युवासेना” या अभियाना अंतर्गत आगामी काळात राजकारणात तरूणांचे हे योगदान मोलाचे ठरणार आहे. यामुळे तरूणांनी राजकारणात येऊन विविध सामाजिक कार्ये व समाज हिताचे कामे करुन युवासेना सक्षम होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर पाटील यांनी केले. ते कुरंगी-बाबंरुड जि. प. गटात आयोजित बैठकीत तरूणांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. 

तसेच लवकरचं मतदार संघातील शिवसेनेत देखील मोठे फेरबदल करण्याचे संकेत यावेळी बैठकीत दिले. तर जुन्या शिवसेना पदाधिकारी यांनी मोठ्या मनाने नवीन लोकांना संघटनेचे काम करायची संधी द्यावी व युवासेनेतील चांगल्या युवासेना पदाधिकारी यांना शिवसेनेत संधी तर नवीन युवकांना युवासेनेत संधी देण्याचे स्पष्ट केले. 

तसेच विरोधकांवर आमदार किशोर पाटील यांनी चौफेर फटकेबाजी करत खोटी गुल्फी (आश्वासने) देऊन मतं मागितली आणि नंतर कुणाचे खात्यात १५ लाख रुपये आणि १० लाख रुपये जमा झाले नसल्याचे टोला बैठकीत विरोधकांना लगावला. पंचायत समितीमधील एका विहीरीमागे ३० हजार रुपये तर गोठाशेड मंजुरीसाठी १० हजार रुपये घेऊन अनेकांना गंडा घालण्यात आला तरी अजुन विहीरी मंजुर झालेले नाहीत तर अशा लुटणारे लोकप्रतिनिधी यांना जबाब भर चौकात जनतेने विचारला पाहिजे. असेही आ. किशोर पाटील यांनी सांगितले. तसेच संघटना वाढावी यासाठी गावपातळीवर पदाधिकाऱ्यामध्ये फेरबदल करण्यात येतील असे शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर संकेत दिले. गेल्या विधानसभेत आमदार किशोर पाटील यांना मताधिक्य का कमी मिळाले ? याचे आत्मचिंतन करायची अचुक वेळ हि असुन तातडीने त्यात सुधारणा कराव्यात असे मार्गदर्शन उप जिल्हाप्रमुख गणेश पाटील यांनी बैठकीत केले.

बैठकीस यांची होती उपस्थिती

यावेळी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम सर्व जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांनी आयोजीत केला होता. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, गणेश पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर माजी पं. स. सदस्य पंढरी पाटील, सुनिल पाटील, सरपंच शिवाजी तावडे, यशवंत पवार, युवराज काळे सह परीसरातील सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पदमसिंग पाटील यांनी सर्वांचे आभार मानले तर बैठकीचे सर्व नियोजन अजयकुमार जैस्वाल सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील, गोपाल पाटील, नितीन पाटील, अमिन शेख, उमेश चौधरी यांनी केले होते.

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version