Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंगेश चव्हाण विजयी होण्याचा तरुणांना विश्वास (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 18 at 4.04.11 PM 1

चाळीसगाव, विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१८) रोजी येथील विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी आमदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या कामांबाबत तेथील नागरिक समाधानी आहेत. त्यामुळे यावेळी महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण हेच निवडून येतील, असा विश्वास मतदार संघातील तरुणांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे.

महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांचा खडतर प्रवास हा तरुणांना नेहमीच आदर्शवत वाटला असल्याचे मत अनेक तरुणांनी व्यक्त केले. एक ग्रामीण भागातील, शेतकऱ्याचा मुलगा ते मुंबई पर्यंतचा युवा उद्योजक हा चव्हाण यांचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चव्हाण हे चाळीसगाव शहर व तालुक्याच्या विकासासाठी टेक्स्टाईल पार्क उभारणी करणार आहेत. या उद्योग व्यवसायातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. २०१६ मध्ये भारतीय जनता पार्टीची नगरपालिकेत सत्ता आली, तेव्हा पासून शुद्ध पाणी पुरवण्याचे काम केले जात आहे. तालुक्यातील पर्यटन विकास, सिंचनाचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत विविध विकास कामे केली आहेत. वरखेडी लोंढे धरण हा त्याचा पुरावा आहे. विरोधकांनी ३५ वर्षात आणलेल्या निधीपेक्षा जास्त निधी आ. उन्मेष पाटील मागील पाच वर्षात आणला आहे. विरोधक केवळ पाणी या एकाच विषयावर निवडणूक लढवीत आहेत, मात्र त्यांनी टाकलेल्या पाइपलाईनचा पाईप वारंवार का फुटतोय ? असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.

Exit mobile version