Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवानेते मंगेश चव्हाण धावले पीर सलीम कादरी नगरातील रहिवाशांच्या मदतीला

3abd0f3b e4f8 475a a28c 767dcc1db1fd

चाळीसगाव प्रतिनिधी | मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील पीर सलीम कादरी नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता युवानेते मंगेश चव्हाण हे मदतीला धावत त्यांनी तातडीने डंपरच्या सहाय्याने परिसरात मुरूम टाकला. एवढेच नव्हे तर, रस्त्यांवर टाकलेल्या मुरूमाची आज स्वतः पाहणीही केली. यावेळी स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील पीर सलीम कादरी नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे युवानेते मंगेश चव्हाण यांनी डंपरच्या सहाय्याने मुरूम टाकला. आज सकाळी युवा नेते मंगेश चव्हाण यांनी स्वत: पीर सलीम कादरी नगरातील रस्त्यांवर टाकलेल्या मुरूमाची पाहणी केली. यावेळी युवानेते मंगेश चव्हाण यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, माजी पं.स.सदस्य सतीश पाटे, बाबा ठेकेदार, मुक्करम कय्यूम, बिस्मिल्ला खान, अक्रम हवालदार, उस्मान सर, इब्राहिम बागवान, शोएब खान, रेहान खान, मेहमूद कुरेशी, सद्दाम शेख, शोएब शेख, सलमान खाटीक, सुभान खान, राऊब कुरेशी, अहमद कुरेशी, जुबेर खान यांच्यासह तरुण व नागरिकांची उपस्थिती होती.

Exit mobile version