Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिंधी कॉलनीत पैशांच्या वादातून तरुणावर चाकूने वार; चार जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात हनुमान मंदिरासमोर पैशांच्या वादातून तरूणावर चाकूने वार करत जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, समतानगर भागातील रहिवासी आकाश भोला राठोड  वय २० हा तरुण कामानिमित्ताने शनिवारी सायंकाळी सिंधीकॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात गेला होता.  यादरम्यान संदीप कोळी याच्यासह इतर तीन जणांनी आकाश सोबत पैशांवरून वाद घातला. या वादातून संदीप कोळी याने आकाशला दगड मारला तर संदीपचा भाऊ याने धारदार शस्त्राने आकाशच्या मांडीवर वार करून दुखापत केली. इतर दोन जणांनाही आकाशला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत आकाश जखमी असुन त्याच्या तक्रारीवरून संदीप कोळी यांच्यासह इतर तीन जण अशा एकूण चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे . पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version