Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तुकारामवाडी येथे तरुणावर कोयत्याने वार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । “वाद घालू नका” असे बोलल्याच्या रागातून दोन जणांनी तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना तुकाराम वाडीतील हनुमान मंदीराजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आकाश गोकूळ पारे (वय-२५) रा. दत्त मंदीराजवळ, तुकाराम वाडी जळगाव हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तुकाराम वाडीतील हनुमान मंदीराजवळ गोल्या ठाकूर रा. जैनाबाद आणि विशाल चौधरी रा. शंकरराव नगर या दोघांचा वाद सुरू असतांना आकाश पारे हा तिथे आला व म्हणाली की, तुम्ही वाद का करता, असा बोलला. या रागातून गोल्या ठाकूर याने त्याच्या कमरेला लावलेलेा कोयत्याने आकाशच्या डोक्यावर वार केले. यात आकाश हा गंभीर जखमी झाला. तर विशाल चौधरी याने शिवीगाळ करून मी तुला पाहून घेईन असा दम दिला. याप्रकरणी आकाश पारे याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोल्या ठाकूर रा. जैनाबाद आणि विशाल चौधरी रा. शंकरराव नगर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश सपकाळे करीत आहे.

 

Exit mobile version