Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी घसरून पडल्याने तरूण जागीच ठार; मध्यरात्रीची घटना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी घसरून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पहूर कसबे येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील जळके येथे शुक्रवारी ८ मार्च रोजी सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरेश काशिनाथ चव्हाण वय २३ रा. पहूर कसबे ता. जामनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, पहूर कसबे येथील सुरेश काशिनाथ चव्हाण हे चोपडा येथे नातेवाईकांकडे गेला होता. गुरुवारी ७ मार्च रोजी रात्री उशीरा ते तेथून पहूर येथे दुचाकीने घरी जात असताना जळके गावाजवळ त्यांची दुचाकी घसरली. यात ते खाली पडून त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यात ते जागीच ठार झाले. ही घटना मात्र शुक्रवारी ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता जळके गावातील काही नागरिकांना हा अपघात झाल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. चव्हाण यांच्या खिशातील आधार कार्डवरून त्यांची ओळख पटली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version