दुचाकीच्या धडकेत तरुण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे दुचाकीच्या धडकेत तरूण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परवेज खान नसिर खान (वय-२३) रा. नशिराबाद ता. जि. जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी १९ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास परवेश खान हा (एमएच १२ सीएस २८८०) क्रमांकाच्या दुचाकीवरुन कामानिमित्त बसस्थानकाकडून बाहेर जात होता. त्यावेळी गावातील गणेश चौधरी याने त्याच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात परवेज खान नसीर खान यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचारानंतर मंगळवारी २१ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता परवेज खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश चौधरी यांच्याविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहे.

 

Protected Content