Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यु

यावल प्रतिनिधी । येथील गणपती नगरातील एका आदिवासी तरुणाचा डेंग्यूच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल शहरातील विस्तारित क्षेत्रातील वसाहतील गणपती नगर मध्ये राहणारा उच्चशिक्षित आदीवासी तरूण सादीक गनी तडवी (वय२३ वर्ष) या तरूणास दिनांक ९ सप्टेंबर हिवताप व वांत्या झाल्याने त्यास उपाचारादाखल केले असता निदानात त्यास डेंग्यु झाल्याची पुष्टी मिळाली व दिनांक ११ सप्टेंबर रोजी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुदैवी मृत्यु झाल्याची घटनासमोर आली. या डेंग्युमुळे मरण पावलेल्या तरूणावर आज सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार (दफनविधी) करण्यात आली. यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात मागील काही दिवसांपासुन काही ग्रामपंचायत आणी आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षीत कारभारामुळे मोठया प्रमाणावर डेंग्युचे रूग्ण आढळुन आले. यावल नगर परिषदच्या क्षेत्रात देखील गेल्या अनेक महीन्यापासुन जंतुनाशक फवारणी करण्यात आली नसल्याने तसेच स्वच्छता मोहीम देखील मंदावल्याने नगर परिषदच्या भोंगळ व दुर्लक्षित कारभारामुळे परिसरातील नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आदीवासी कुटुंबातील शिक्षक गनी तडवी यांना मरण पावलेला उच्च शिक्षीत तरूण सादीक तडवी दोन बहीणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या अशा मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली असुन नगर परिषदच्या कारभारा बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे .

 

 

Exit mobile version