Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेवाळे येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील शेवाळे (वाडी) येथील २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. शेवाळे येतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मंगळवार, दि.१७ रोजी घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन सदरचा गुन्हा पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये शुन्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील प्रविण सुरेश निकम हे त्यांचे डोंगरगाव शिवारात बाजरी काढण्याचे काम सुरू असतांना प्रविण निकम हे विहिरीजवळ गेले असता त्यांना अचानक विषारी सापाने चावा घेतला. ते बेशुद्ध अवस्थेत पडून राहिले. आपला भाऊ बऱ्याच वेळापासून घरी न आल्याने त्यांचा भाऊ एकनाथ निकम हे त्याचा शोध घेण्यासाठी विहिरीजवळ गेले असता त्यांना प्रविण बेशुद्ध आढळून आला. त्यांनी उपचारासाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. मयत प्रविण निकम त्यांच्या पश्च्यात आई, एक भाऊ, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version