Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथील तरूण चिठ्ठी लिहून बेपत्ता; नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कासार गल्लीतील राहणारा तरूण मोबाईल आणि चिठ्ठी लिहून घरातून निघून गेला आहे. नातेवाईकांकडून त्याचा शोधाशोध सुरू आहे. याबाबत अद्याप फैजपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही.

 

याबाबत माहिती अशी की, आदित्य तुळशीराम काठोके (वय-१८) रा. कासार गल्ली, फैजपूर हा तरूण आपल्या आई वडील आणि बाहिणीसोबत वास्तव्याला आहे. आदित्य सध्या जळगाव येथील शासकीय आयटीआय शिक्षण घेत आहे तर वडील तुळशीराम काठोके हे प्लॉट खरेदी व विक्री करण्याचे काम करतात. दरम्यान, सोमवारी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अदित्य काठोके हा घरात कुणाला काहीही न सांगता त्याचा मोबाईल आणि चिठ्ठी लिहून घरातून कपड्यांची बॅग घेवून बेपत्ता झाला आहे. चिठ्ठीत त्याने लिहून ठेवले की, मला घरात सन्मान मिळत नाही, म्हणून मी घर सोडून जात आहे, माल कुणी विचारत नाही.’ असा मजकूर लिहिलेला आढळला. आईवडील व बहिण यांनी आदित्याची शोधाशोध सुरू केली आहे. याबाबत अद्याप फैजपूर पोलीसात कुठलीही नोंद अथवा तक्रार करण्यात आलेली नाही.

 

कुणाला आढळून आल्यास 9423914789, 9595766378 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version