Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दापोरा येथील तरूणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी ।  बाहेर फिरून येतो असे सागून घरातून निघलेल्या दापोरा येथील २४ वर्षीय तरूणाने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अकस्माम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, विशाल शांताराम पवार (वय-२४) रा. दापोरे पो. शिरसाळा ता.जि.जळगाव हा तरूण आई व बहिणीसह राहतो. शिक्षणासह आईसोबत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जबाजारीतून तो तणावात होता. दरम्यान, २९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता बाहेर जावून येतो असे सागून दुचाकीने घराबाहेर पडला. शिरसोली व दापोरे रेल्वे दरम्यानच्या अप लाईनवरील  रेल्वे खंबा क्रमांक ४०६/ १७-१९ जवळ दुचाकी लावून त्याने धावत्‍या रेल्वेखाली येवून आत्महत्या केली. गँगमन पांडे यांनी तत्काळ रेल्वे स्टेशन मास्तर यांना सांगितले.  घटनास्थळी रेल्वे पोलीसांनी यांनी धाव घेतली. मयताच्या खिश्यातील कागदपत्रांमुळे ओळख पटली. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Exit mobile version