Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भादली येथील तरूणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली येथील ३५ वर्षीय तरूणाने रविवारी २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास  रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीला आली आहे. नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

भागवत अशोक फेगडे (वय ३५, रा. भादली) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली येथील भागवत फेगडे  हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून भादली रेल्वेस्थानक परिसरात धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली.  आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Exit mobile version