Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आसोदा येथील तरूणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा येथील तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.  याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

समाधान मुलचंद कोळी वय २८ रा. वाल्मिक नगर, असोदा ता.जि. जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.  अधिक माहिती अशी की, समाधान कोळी हा आसोदा गावात चायनीज विक्रीचे गाडी लावून आपल्या आई वडिलांसह उदरनिर्वाह करतो. आईवडील असून त्याचे आई वडील शेती सांभाळतात. आज शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास समाधान हा शौचालयाला जाऊन येतो असे घरात सांगून दुचाकीने बाहेर पडला. असोदा रेल्वे गेटपासून १ कीलोमीटर अंतरावर पाच मोरी असोदा शिवार जवळ रेल्वे खंबा क्रमांक 423/1 डाऊन लाईनवरून येणाऱ्या  धावत्या रेल्वेखाली येऊन आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल साहेबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यांच्या बाजूला पडलेली दुचाकी आणि खिश्यातील कागदपत्राच्या आधारे ओळख पटली.

 दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

 

Exit mobile version