Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नोकरीचे आमिष दाखवत तरूणाची साडेतीन लाखात फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कॉलेजात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत मध्यप्रदेशातील दाम्पत्याने शहरातील  देवेंद्र नगरातील तरूणाची साडे तीन लाखात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवेंद्र नगरात उमेश राजेंद्रप्रसाद चौरसिया वय 37 हा वास्तव्यास आहे. फेब्रुवारी 2020 ते डिसेंबर 2020 या दरम्यान छींदवाडा येथील शिवशंकर लखन जवरकर व नीतू शिवशंकर जवरकर या दाम्पत्याने उमेश चौरसिया यांच्यासोबत संपर्क साधला ‌. उमेश याचा विश्वास संपादन करून दोघांनी उमेशला छिंदवाडा येथील मेडिकल कॉलेजला अकाउंटंट म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. उमेशला विश्वास बसावा म्हणून नोकरी लागल्या बाबतचे बनावट पत्र तयार करून दोघांनी उमेश च्या मोबाईलवर पाठवले व त्यानुसार पैशांची मागणी केली. अशा पद्धतीने दोघांनी उमेश याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले.  पैसे देऊनही प्रत्यक्षात नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर उमेश चौरसिया याने तब्बल दोन वर्षानंतर बुधवारी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली या तक्रारीनुसार शिवशंकर  जवरकर व नीतु जवरकर या दाम्‍पत्‍य विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.

Exit mobile version