Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मास्टर कॉलनीत तरूणाला बेदम मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथील एका तरुणाला काही एक कारण नसतांना डोक्यात दगड मारुन जखमी केल्याची घटना घडली. आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मास्टर कॉलनी परिसरात मोहम्मद जावेद शेख सादीक (वय २१) हा तरुण राहतो. मजुरी करुन तो उदरनिर्वाह भागवितो. मंगळवारी तो त्याच्या घरासमोर उभा असतांना काही एक कारण नसतांना जावेद, सादीक मुलतानी व आदिल मुलतानी तिघे रा. मास्टर कॉलनी यांनी मोहम्मद जावेद शेख यास शिवीगाळ करत दमदाटी केली. तिघांपैकी जावेद याने मोहम्मद जावेद शेख यास डोक्यात दगड मारुन दुखापत केली. अशा मोहम्मद जावेद शेख सादीक याच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात जावेद पूर्ण नाव माहित नाही, सादीक मुलतानी व आदिल मुलतानी या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास फारुक तडवी करीत आहेत.

Exit mobile version