Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गेंदालाल मिल भागात तरूणाला मारहाण

जळगाव प्रतिनिधी । काहीही कारण नसताना मद्यपीने एका तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गौरव जगन कोळी (२०, रा.गेंदालाल मिल) या तरूणाला मारहाण केली आहे. मंगळवारी रात्री ९ वाजता गेंदालाल मिल परिसरातील दुर्ग्याजवळ गौरव हा उभा होता. त्या ठिकाणी मद्याच्या नशेत असलेला अजित उर्फ कुबड्या (पुर्ण नाव माहित नाही.)हा आला व त्याने काहीही एक कारण नसताना गौरवच्या चेह-यावर मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मोरे करीत आहेत.

Exit mobile version