Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणाला मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या  रागातून ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात काठी मारून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील इच्छादेवी चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल सुधाकर बागुल (वय-३५, रा. हनुमान नगर मेहरूण) हा तरुण मजुरी करून उदरनिर्वाह करतो. बुधवार २ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील इच्छादेवी चौकात उभा असतांना त्याठिकाणी सलीम ऊर्फ भाल्या तडवी रा. तांबापुरा जळगाव हा त्या ठिकाणी आला. आणि कुणालकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. कुणालने दारूसाठी पैसे दिले नाही, याचा राग आल्याने सलीम तडवी याने हातातील काठी ठोक्याला मारली. यात कुणाल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. यासंदर्भात गुरुवार ३ मार्च रोजी दुपारी १ वाजता संशयीत आरोपी सलीम ऊर्फ भाल्या तडवी रा. तांबापुरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुनील सोनार करीत आहे.

 

Exit mobile version