Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उसनवारीच्या पैश्याच्या वादातून तरूणाला लोखंडी फायटरने मारहाण

यावल प्रतिनिधी । उसनवारीचे पैसे घेण्याच्या वादातून दोघांनी लोखंडी फायटरने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील संभाजी पेठेत घडली. यावल पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर हकीकत अशी की, सौरभ डिगंबर बैरागी (वय-२१) रा. मटन मार्केट यावल यांचा मित्राचे पैसे गावातील अजय अशोक नारेकर रा. बुरूज चौक याने घेतले होते. मित्राने घेतलेले पैसे काढून द्यावे यासाठी अजय १९ मे रोजी सकाळी १० वाजता सौरभकडे गेला. त्यावेळी सौरभने  संगितले की माझा आणि तुझ्या मित्राशी काहीही संबंध नाही असे सांगितले. याचा राग अजय नारेकरला आल्याने अजयसोबत त्याचा भाऊ दिपक अशोक नारेकर यांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तर अजयने त्याच्याजवळील लोखंडी फायटरने सौरभच्या डोक्यावर आणि मानेवार वार करून जखमी केले. सौरभ बैरागी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात मारहाण करणारे दोन्ही भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Exit mobile version