Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजेच्या धक्क्याने तरूणीचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा येथील ३२ वर्षीय तरूणीचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवार २२ सप्टेंबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आसोदा येथे पूनम धनराज भोळे (वय-३२) ही तरुणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होती. गुरुवार २२ सप्टेंबर रोजी तिला विजेचा जोरदार धक्का लागला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे.

Exit mobile version