Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोरखेडा येथे मोर नदीत बुडून तरुणाचा मृत्यु

WhatsApp Image 2019 09 13 at 2.50.37 PM

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील बोरखेडा बु॥येथील तरुणाचा मोर नदीच्या पाण्यात पडुन बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,  यावल तालुक्यातील बोरखेडा या गावात राहणारा सदु कडु भिल्ल (वय ३५ वर्ष) हा विवाहीत तरुण मागील दोन दिवसाबाहेर गेल्यापासुन घरच्या मंडळीच्या संपर्कात नसल्याने त्याच्या कुटुंबाच्या मंडळीने सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो मिळुन आला नाही.  काल दिनांक १२ सप्टेंबर रोजी तो फैजपुर शिवारातील मोर नदीच्या काठावर मृत्युअवस्थेत आढळुन आला. बोरखेडा येथील गावातील पोलीस पाटील मकबुल महेबुब तडवी यांनी फैजपुर पोलीस स्टेशनला खबर दिल्याने आक्समात मृत्युच नोद करण्यात आली आहे.  तपास पोलीस कर्मचारी हे करीत असुन, मयत सदु कडु भिल्ल याचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांनी केले.

Exit mobile version