Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आधार कार्डासाठी मोजावे लागणार पैसे !

नवी दिल्ली । आजवर आधार कार्ड काढण्यासाठी अथवा यात फेरफार करण्यासाठी पैसे लागत नव्हते. तथापि, आता यासाठी शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

आधार कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन किंवा महा ई सेवा केंद्राचा वापर करण्यात येतो. यापूर्वी आधार कार्डवर कोणताही बदल करावा असल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. परंतु आता आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. याबाबत युआयडीआयएकढून सांगण्यात आले आहे. जर आपल्याला बायोमेट्रीकमध्ये बदल करायचा असेल तर ५० रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

आधार कार्डवर बदल करतेवेळी अर्जासोबत फी भरावी लागणार आहे. याचबरोबर आपले नाव, पत्ता किंवा जन्माची तारीख बदलण्यासाठी आपल्याला वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आपल्याला आधार नविन आधार कार्ड काढायचे असल्यास किंवा त्यात कोणतेही नविन बदल करायचे असल्यास याबाबत आपण ऑनलाईन परवानगी घेऊ शकतो. दरम्यान ही सुविधा सर्वच आधार केंद्रावर असेल असे नाही. याचबरोरबर यूआयडीएआयच्या वेबसाइटद्वारे आपली तारीख निश्‍चित करू शकता.

Exit mobile version