Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी प्राचार्या सुनिता चतुर्वेदी यांचे चित्रकार योगेश सुतार यांनी काढले लाईव्ह पोर्ट्रेट ( व्हिडीओ )

Yogesh sutar

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पु.ना.गाळगीळ कला दालनात चित्रकार योगेश सुतार हे दर रविवारी सांयकाळी चार वाजता लाईव्ह पोर्ट्रेट रेखाटत असतात. तसेच काढलेल्या चित्रांचे पु.ना. गाडगीळ कला दालनात योगेश सूतार यांच्या काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत आयोजन केले जाते.

 

अश्याच पध्दतीने रविवार 31 मार्च रोजी बेंडाळे महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या सुनिता चतुर्वेदी यांचे लाईव्ह पोर्ट्रेट काढले. चित्रकार योगेश सुतार यांनी अवघ्या एका तासात पोर्ट्रेट चित्र काढले. चित्र काढण्यापुर्वी समोरील व्यक्तीने कसे बसले पाहिजे, शरीराची कशी हालचाल केली पाहिजे, कोणत्या ॲगलने बघितले पाहिजे याबाबत सुचना देवून चित्र काढण्यास सुरूवात करतात ही खाशीयत…

यावेळी बेंडाळे महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या सुनिता चतुर्वेदी, पु.ना. गाडगीळचे व्यवस्थापक खेमराज, कर्मचारी वैशाली बोरसे, प्राचार्य जितेंद्र भारंबे, नागरपूर येथील कला महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल पाटील, प्रा. भिकन पाटील, प्रा. रूपाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पहा – पु.ना. गाडगीळ कला दालनात लाईव्ह पोर्ट्रेट काढतांना चित्रकार योगेश सुतार

 

 

चित्रकार योगेश सुतार यांच्या विषयी थोडेसे ,  खालील लिंकवर क्लिक करा

चित्रकार योगेश सुतार यांच्या सृजनाची भरारी (व्हिडीओ)

 

Exit mobile version