Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी योगेश राजपूत

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जाणता राजा हिंदवी स्वराज्याचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवासाठी “जयंती उत्सव” समितीची निवड करण्यात आली असुन अध्यक्षपदी योगेश राजपुत तर उपाध्यक्षपदी विवेक अडकमोल यांची निवड करण्यात आली आहे.

यावल  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तिथि प्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्या संदर्भात बैठकीचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी ह्या वर्षी साजरी होणाऱ्या जयंती साठी अध्यक्ष म्हणून योगेश सुरजसिंग राजपूत(पाटील) यांची तर उपाध्यक्ष पदी विवेक वासुदेव अडकमोल यांची निवड करण्यात आली.

सचिव सागर, अशोक देवांग, खजिनदार जितेंद्र फालक यांची निवड करण्यात आली. सभासद म्हणून जगदीश कवडीवाले, पप्पू जोशी, तुषार पाटील (मुन्ना पाटील ), संतोष धोबी, शरद कोळी, किरण बारी, किशोर कुलकर्णी, सुनिल बारी,सागर बोरसे, रविंद्र सोनोवणे,हुसेन तडवी,कडू पाटील, योगेश चौधरी, निलेश पाराशार, गजू भोसले यांची निवड करण्यात आली. बैठकीस यावल शहरातील शिवप्रेमी नागरिक व सर्व पक्षीय कायकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version