Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जागतिक योगदिनाच्या पुर्वसंध्येला योगशिबीर उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्ह्यातील आरोग्य भारती, अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ आणि ‘निमा’ या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या संघटनेने मिळून योगदिनाच्या पूर्वसंध्येस योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ८० डॉक्टर, योगशिक्षक आणि साधक यांनी मिळून योगाचा सराव करून नियमित योग साधना करण्याचा प्रण केला. संपूर्ण विश्वात दि. २१ जून हा जागितक योगदिवस म्हणून साजरा होतो. यावेळी भारतासह विश्वातील १८० च्या वर देश हा दिवस योगसाधना करून साजरा करीत आहे. योगातून शारीरिक स्वस्थासह मानसिक स्वस्थ देखील राखल्या जाते. त्यामुळे या दिनाचे महत्त्व सर्व देशांना कळले आहे.

भारतात आरोग्य भारतीच्या माध्यमातून डॉक्टर आणि योगशिक्षक एकत्र येऊन समाजाच्या स्वास्थासाठी अहोरात्र झटत आहे. तर अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ योगशिक्षकांच्या कल्याणासाठी कार्य करीत आहे. या दोन्ही संघटनेचा हेतू जवळपास सारखा आहे. समाजात योगाचे ज्ञान वाढून समाजातील प्रत्येक घटकाने योग करून आपले आरोग्य अबाधित राखावे आणि पूर्ण स्वास्थ प्राप्त करावे.

जळगाव मधील या दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जळगाव शहरात नेहमीच समाजोपयोगी कार्य केले आहे. समाजाच्या आरोग्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेणे, योग शिबीर घेणे आदी कार्य सातत्याने घेत आहोत. यावेळी आरोग्य भारतीच्या अध्यक्षा डॉ.  लीना पाटील आणि प्रांत सचिव डॉ.  पुष्कर महाजन यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात डॉ. शरयू विसपुते आणि त्यांचे दोघ चिरंजीव स्पर्स आणि स्पंदन यांनी योग नृत्य सादर केले तर सुनील गुरव आणि सुभाष तळेले यांनी अवघड आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

योग दिनाच्या पूर्वसंध्येला झालेला कार्यक्रम संभाराजे नाट्यगृह येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा महाजन यांनी केले, प्रास्ताविक कृणाल महाजन यांनी केले. साधकांचे योग प्रोटोकॉल डॉ. भावना चौधरी यांनी घेतले तर योग डेमो देण्यासाठी सुनील गुरव आणि डॉ. शरयू विसपुते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

Exit mobile version