Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

होय, पेंग्वीनच्या उपाधीचा मला अभिमान ! : आदित्य ठाकरे

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पेंग्वीन या त्यांना देण्यात येणार्‍या उपाधीबाबत स्पष्ट भाष्य केले आहे.

वारंवार करण्यात येणार्‍या पेंग्विन नावाच्या टिकेला अदित्य ठाकरेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पेंग्विन नावाचा आपल्याला अभिमान असल्याचे ते म्हणाले. विरोधकांच्या पेंग्विन टीकेमुळे जिजामाता उद्यान प्रॉफिटमध्ये आले असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी याकूब मेमनच्या कबरीवरून सुरू असलेल्या आरोपांबाबतही विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे यांना विरोधक पेंग्वीन म्हणून खिल्ली उडवत असतात. विशेष करून राणे पिता-पुत्र त्यांना याच नावाने संबोधत असतात. यावर आज आदित्य ठाकरेंनी भाष्य केले आहे. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, पेंग्विन नावाचा आणि त्यासाठी केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही मुंबईसाठी काम केले आहे. आम्ही रोज बदली सरकार झालो नाही असे म्हणत राज्यात काही हिटलर शाही आली आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, पेग्विन नावाचा आपल्याला अभिमान असल्याचे ते म्हणाले. विरोधकांच्या पेंग्विन टीकेमुळे जिजामाता उद्यान प्रॉफिटमध्ये आले असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी याकूब मेमनच्या कबरीवरून सुरू असलेल्या आरोपांबाबतही विरोधकांवर जोरदार टीका केली.

Exit mobile version