Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

होय, मी शिवसेनेच्या संपर्कात होतो : एकनाथराव खडसे

gulbrao khadse

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे नाराज नेते एकनाथराव  खडसे हे आमच्या संपर्कात होतो, असे सांगून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी खळबळ उडवून दिली होती. परंतू यावर खुद्द खडसे यांनी होय, मी शिवसेनेच्या आणि सेनेचे काही नेतेही माझ्या संपर्कात होते हे खरं असल्यामुळे म्हणून ना.पाटलांचे वक्तव्य खरे असल्याचे एकप्रकारे स्पष्टच केले आहे.

 

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी म्हटले की, रोहिणी खडसेंना पाडण्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत, त्याची नोंद पक्षाने घेतली आहे, असे खडसेंनी स्पष्ट केले आहे. मी भाजप सोडू शकतो किंवा जाऊ शकतो असे म्हटले नव्हते, मी संन्यासही घेऊ शकतो, पक्षाने माझ्या मागणीची नोंद घेतली याचे समाधान आहे. मला न्याय मिळेपर्यंत मी संघर्ष करणार, असेही खडसेंनी नमूद केले आहे. तर पक्षाने माझे तिकीट का नाकारले? हे मला कळले नाही.कोअर कमिटीच्या मिटींगमध्ये देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मला तिकीट देण्यात आले नाही. नाराजी काय आहे हे मला सांगण्यात आले नाही, म्हणून मी त्याविषयी पक्षश्रेष्ठींकडे कारवाईची मागणी केली आहे”, असे खडसे म्हणाले.

Exit mobile version