Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कर्तव्य पूर्ती सोहळा उत्साहात

यावल  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील आदिवासी एकता मंच कर्मचारी संघटनेच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या येथील आश्रमशाळेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा आज यावल येथील जिल्हा आदीवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्यध्यापक एम. बी. तडवी होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वनिता सोनवणे ह्या होत्या, या सेवापुर्ती सोहळा कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा, महामानव भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

जिल्हा आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व वस्तीगृह यातील आपल्या शासकीय सेवेचा सेवाकार्यपुर्ण करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी यांचा मान्यवरांच्या स्मृतिचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक परिवारासह सन्मान सत्कार करण्यात आला.

यात सेवापुर्वी करणारे रामचंद्र मोरे, मंगलाबाई चव्हाण, ईश्वर पारधी, अहमद तडवी, वैजनाथ नाईक, हैदर तडवी, हरी चव्हाण, सुपडू पाटील, उषाताई ठाकूर, जहांगीर तडवी, गणेश तळेले, रामकृष्‍ण महाजन, वासुदेव नेरकर, रंजना कोळी, सुरेखाताई भालेराव, हिरामण सोनवणे, कमलाताई शिंदे, इत्यादी कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपूर्ती सोहळ्यात सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रसंगी आदिवासी प्रकल्प आढावा समितीच्या सदस्य जुबेदा बाई मुजात तडवी व सदस्य प्रताप भाऊ बारेला हे उपस्थित होते तसेच स. प्र.अधिकारी जे.आय.तडवी, स.प्र.अ पवन कुमार पाटील तसेच सौ एम आर सुलताने , एम पी.राणे. एस आर पाटील , यावल येथील गृहपाल आर. आर. कोचुरे जळगाव गृहपाल गाढे सर,प्रकल्प कार्यालयातील वाय एस पवार , भोई प्रकल्प कार्यालय कार्यालय अधीक्षक झांबरे तसेच चांदसर येथील मुख्याध्यापक देशपांडे , देवझिरी मुख्याध्यापक सुनील चौधरी (डोंगर कोठारा मुख्याध्यापक ), वानखेडे ,संदेश सोनवणे , पळासखेडा मुख्याध्यापक आर एस तायडे सर

जोंधनखेडा येथील मुख्याध्यापक सचिन गायकवाड (कृष्णापुर येथील अधीक्षक ) , सुहास देवराज,चांदसर येथील अधीक्षक गजरे सर जोंधनखेडा अधीक्षक पंकज फेगडे डोंगर कठोरा येथील अधीक्षक बारी(लालमाती ), येथील आर एस पाटील , सैंदाणे सर प्रकल्प कार्यालयातील लिपिक बबलू तडवी इत्यादी मान्यवरांचा एकता मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच यावल प्रकल्पातील प्रकल्प अध्यक्ष दस्तगीर तडवी, प्रकल्प उपाध्यक्ष विजयानंद सुरवाडे, प्रकल्प सचिव निलेश तडवी, महिला अध्यक्ष मोनिका खरात, कार्याध्यक्ष प्रदीप बारेला, उपाध्यक्ष पुष्पलता जाधव ,प्रकल्प सल्लागार भरत भेंडवाल ,प्रकल्प खजिनदार न्याजोद्दिन तडवी, दीपक सोनवणे उल्हास पाटील, समशेर दादा, सुरेश साळुंखे, खराटे सर, नवल राठोड, मनोज उजडेकर, अल्लाउद्दीन तडवी, राजू तडवी, हटकर यांनी व प्रकल्पातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

या प्रसंगी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे समस्यांचे निराकरण करण्यात येईल व सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले, भूपेंद्र पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर व सत्कार मूर्तींचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालमाती येथील अधीक्षक व एकता मंच चे राज्य सदस्य मनीष तडवी सर यांनी केले.

Exit mobile version