Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहिगावात एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथे एटीएम मशिन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील दहिगाव मधील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे आज सकाळी उघडकीस आला. हा प्रकार २७ चे रात्री घडला दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले एटीएम फोडले असल्याचे सकाळी स्टेट बँक ग्राहकांच्या लक्षात आल्यानुसार तत्काळ त्यांनी पोलीस पाटील संतोष जीवराम पाटील यांना व सरपंच अजय-अकमल यांना कळविले. त्यानुसार त्वरित दोघांनी यावल पोलिसात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना कळवल्यानुसार पोलीस निरीक्षक व विभागीय पोलीस अधिकारी डॉ . कृणाल सोनवणे यांनी भेटी देऊन ग्रामपंचायततिने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तपासणी केली. त्यानुसार एका संशियतास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, संबंधीत एटीएम च्या कक्षात कुठलीही बेल किंवा कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे या संधीचा फायदा चोरट्याने घेतल्याचे दिसुन येत आहे. एटीएमचे पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्याचा असलेला पट्टा तोडलेला आहे. यात सुमारे एटीएम मधील ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान चोरट्याने तोडफोड करून केलेले दिसून आले. आहे.

दरम्यान, पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे व मार्ग सर्व तपासणी केली. त्यानुसार एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. घटनास्थळीचा पंचनामा फौजदार सुदाम काकडे सहाय्यक फोजदार नितीन चव्हाण यांनी केला.

अलीकडेच गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे दरवाजाचे कुलूपही तोडण्यात आले होते. त्याचप्रमाणे आदर्श विद्यालयात आधी संगणक कक्ष तोडून फेकण्यात आलेले होते तर जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत दोन वर्षात दोन वेळा एटीएम रूम फोडून नुकसान करण्यात आलेले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करावा. तसेच, गावातील पोलीस चौकीत कायमस्वरूपी एक तरी कर्मचारी रहावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दहिगावात अनेक वेळा रात्रीच्या वेळेस घटना घडत असतात. एखाद्या वेळेस फार मोठा अनर्थ होऊ शकतो. याला जबाबदार कोण राहणार ? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.

या घटनेची फिर्याद एटीएम वेंडर दीपक दौलत तिवारी यांनी यावल पोलिसात दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकारी करीत आहेत.

Exit mobile version