Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन

 

यावल प्रतिनिधी | तालुक्यात ग्रामपंचायत पातळीवर आमदार स्थानिक निधीतुन मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत चिखली खुर्द व चिखली बु॥ गावासाठी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी सोबत जि.प गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, जळगाव जिल्हा अनु जाती विभाग काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे कादिर खान, अनिल जंजाळे तसेच चिखली बु॥ येथील सरपंच सौ पुष्पाताई महाजन ,घनशाम महाजन, ग्राम पंचायत सदस्य लखन तायडे, पुंडलिक महाराज, बबलू महाजन, ग्रामसेविका रूपाली तळेले , ग्राम पंचायत संगणक संचालक पवन तायडे आदी उपस्थित होते. त्याच प्रमाणे चिखली खु॥ येथील सरपंच राजेंद्र पाटील, जळगाव जिल्हा अनु जाती विभाग काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे , विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील, प्रभाकर विठ्ठल पाटील, ग्रामसेवक संजय चौधरी, मुकेश पाटील यांच्या उपस्थित होते आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते विकास कामांचे भुमिपुजन करून कामांची सुरूवात करण्यात आली. दरम्यान याशिवाय तालुक्यातील हंबर्डी , हिंगोणा , भालोद , बामणोद , आमोदा,न्हावी ग्रामपंचायत अंतर्गत ही विविध विकास कामांचे भूमिपुजन करून शुभारंभ आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलेत.

Exit mobile version