Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक उत्साहात

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आज फैजपूर येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावल येथील क्रिडांसंकुल साठी याआधी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, आता अजून वाढीव निधी ४ कोटी रुपये असे एकूण ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सुसज्ज असे क्रिडासंकुल यावल शहरात लवकरच तयार होणार आहे. त्यासाठी जमीन सपाटीकरण व आराखडा तयार करण्यासाठी आर्किटेक ची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच यावल तालुक्यातील खेळाडूंना खेळण्यासाठी क्रिडा संकुल उभारण्याचा समितीचा प्रयत्न आहे.

या बैठकीत महेश पवार (तहसीलदार यावल), मनोज म्हसे (मुख्याधिकारी यावल नगरपरिषद), मीनल थोरात (तालुका क्रिडा अधिकारी), नैमुदीन शेख (गटशिक्षणाधिकारी), जे. एस. तडवी(अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग), के. यु. पाटील मुख्याध्यापक तथा क्रिडा समन्वयक यावल  उपस्थित होते.

 

Exit mobile version