Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुका पोलीस पाटील संघाची नूतन कार्यकारीणी जाहीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुका पोलीस पाटील संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

तालुका पोलिस पाटील संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली असुन तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी गणेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पोलीस पाटील संघाचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्याअध्यक्षतेखाली व जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. याच बैठकीत यावल तालुका पोलिस पाटील संघाची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी यावल तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे कार्यकारणी यावल तालुका पोलिस पाटील तालुका अध्यक्ष म्हणून निलेश बन्सीधर सोनवणे रिधुरी तर तालुका उपाध्यक्ष म्हणून गणेश साहेबराव पाटील चुंचाळे;तालुका सचिवपदी राजरत्न राहुल आढाळे (डोंगरकठोरा ) यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्ष – चंद्रकांत देविदास पाटील (विरावली ), सोशियल मिडिया प्रमुख- सचिन हिरालाल तायडे ( भालशिव ) सदस्य – महेमूद तडवी (परसाळे ), युवराज पाटील (मोहराळे ),अरूण पाटील ( चिखली ), गोकुळ एकनाथ शकोपाळ (बोरावल बु ), कैलास बादशाह (कासवा ), तर जिल्हा कार्यकारणीसाठी जिल्हा उपाध्यक्ष पदी- पवन हेमंत चौधरी (अट्रावल ), जिल्हा संघटक- सुरेश वामन खैरनार (पाडळसा ), तर महिला जिल्हाकार्यध्यक्षपदी- सौ.प्रफुल्लाताई गोटुलाल चौधरी ( म्हैसवाडी तालुका यावल ) यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेस तालुक्यातील सर्व पोलिस पाटील बंधु भगिनी मोठया संख्येत उपस्थित होते. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व जिल्हा कार्यध्यक्ष अशोक पाटील यांनी नुतन कार्यकारणीचे स्वागत केले.

Exit mobile version