Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू तस्करांची पोलीस पाटलासह कुटुंबाला मारहाण

FIR

यावल प्रतिनिधी | ”आमचे वाळूचे ट्रॅक्टर तहसीलदारांना सांगून पकडायला का लावतो ?” या कारणावरून तालुक्यातील सावखेडा सीम येथील पोलीस पाटलासह त्यांच्या कुटुंबाला वाळू तस्करांनी मारहाण करून धमकावल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावखेडा सिम येथील पोलीस पाटील पंकज बडगुजर हे आपल्या कुटुंबासोबत जेवण करीत असतांना गावातील प्रकाश सुभाष पाटील , दिलीप सुभाष पाटील , विकास पंडीत पाटील , विजय विकास पाटील , चेतन विकास पाटील यांनी त्यांच्या घरात अनधिकृत प्रवेश करून त्यांना मारहाण केली.

तु आमचे रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडयाला लावतो असे बोलुन तु पोलीस पाटील कसा राहतो असे बोलुन व शिवीगाळ करीत संशयीत आरोपी यांनी पोलीस पाटील यांना खाटेच्या दांडाने मारहाण केली. या वेळेस पंकज बडगुजर यांच्या भाऊची पत्नी दिपाली राहुल बडगुजर, पत्नी पुनम पंकज  बडगुजर व भाऊ जिवन दयाराम बडगुजर आणि राहुल जिवन बडगुजर यांना ही लाकडी दांडयाने मारहाण करून दुखापत करण्यात आली. याबाबत पोलीस पाटील पंकज जिवन बडगुजर (वय३५ वर्ष राहणार सावखेडा सिम) यांनी यावल पोलीसात फिर्याद दाखल केल्या असुन भाग ५ गु.र.न.११६ / २०२१ भादवी कलम१४३ , १४७ , १४९ , ४५२ , ३२३ , ३२४ , ५०४ , ५०६ , ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Exit mobile version