रूबाब तडवी आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने सन्मानित

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामसेवक रूबाब मोहम्मद तडवी यांचा आज महाराष्ट्र शासनाच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरव करण्यात आले.

यावल पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन अतिदुर्गम क्षेत्रात आदीवासी गावात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रूबाब मोहम्मद तडवी यांचा शनिवारी महाराष्ट्र शासनाच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरव करण्यात आले. जळगाव येथील जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेश मामा भोळे , जिल्हाधिकारी अमन मित्तल, जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया , ग्रामसेवक संघटनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजिव निकम, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार गोराळे यांच्यासह सर्व सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे. यावलच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजूश्री गायकवाड यांची उपस्थिती होती.

याच कार्यक्रमात अनेक वर्षापासुन यावल तालुक्यातील गाडर्‍या जामन्यायासातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या अतिदुर्गम क्षेत्रात प्रशासकीय सेवा करीत आदीवासी परिसरातील ग्रामीण भागात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रुबाब मोहम्मद तडवी यांचा सन्मान करण्यात आला आहे.
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले रूबाब मोहम्मद तडवी यांना राज्यस्तारिय आदर्श पुरस्कार त्यांच्या कुटुंबातील राष्ट्रपती पुरस्कार पत्नी मेहमुदा तडवी, मुलगी अंजली तडवी, मुलगा राहुल तडवी यांच्या सोबत देण्यात आला. रूबाब तडवी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव पी व्ही तळेले ,हितु महाजन , मजीद तडवी , राजु तडवी , बी. के. पारधी , सुबोत सोहे ,रविन्द्र बाविस्कर , रूपाली तळेले , दिपक तायडे ,डी एस तिडके , सोनाली सोनवणे ,भोजराज फालक, प्रियंका बाविस्कर यांच्यासह ग्रामसेवक संघटनेच्या सर्व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

Protected Content